Advertisement

ट्रॅव्हल्स-बसचा भीषण अपघात

प्रजापत्र | Thursday, 28/07/2022
बातमी शेअर करा

परळी-परळी-गंगाखेड रोडवरील करमपाटीजवळ आज रात्री 11 च्या सुमारास ट्रॅव्हल्स आणि बसच्या भीषण अपघातात 8 ते 10 जण जखमी झाले असून एसटीचे चालक गंभीर असल्याची माहिती आहे. सध्या जखमीवर परळीच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

   

गुरुवारी रात्री 11 च्या सुमारास परळी-गंगाखेड रोडवरील करमपाटीजवळ गंगाखेडच्या माऊली कृपा आणि लातूर-नागपूर बसचा समोरासमोर अपघात झाला. दोन्ही गाड्या भरधाव वेगात असल्यामुळे बस-ट्रॅव्हल्सला मोठी हानी पोहचली असून यात 8 ते 10 जण जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान यातील एसटी चालकाची प्रकृती गंभीर असून परळीच्या सरकारी रुग्णालयात जखमीना उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

 

Advertisement

Advertisement