Advertisement

रुग्णवाहिका पलटी

प्रजापत्र | Wednesday, 13/07/2022
बातमी शेअर करा

परळी - रुग्णाला सोडून गंगाखेडकडे परत निघालेल्या रुग्णवाहिकेचा परळीच्या पुढे दगडवाडी जवळ अपघात झाला. या अपघातात रुग्णवाहिकेचा चालक जागेवरच ठार झाला. हा अपघात आज बुधवारी (दि.१३) सकाळी ९ वाजताच्या सुमारास झाला.

प्राथमिक माहितीनुसार, गंगाखेड येथील रुग्णवाहिका एका रुग्णाला अंबाजोगाई येथे सोडून परत गंगाखेडकडे जात असताना दगडवाडी जवळील चढावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ही रुग्णवाहिका रस्ता सोडून खाली पलटी झाली. यात रुग्णवाहिकेचा चालक गजानन चिलगर याचा जागीच मृत्यू झाला. मयताचा मृतदेह परळी उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

Advertisement

Advertisement