Advertisement

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

प्रजापत्र | Sunday, 03/07/2022
बातमी शेअर करा

गेवराई - बीड जिल्ह्यामध्ये कर्जबाजारी शेतकर्‍याच्या आत्महत्या सुरूच आहेत. आज सकाळी गेवराई तालुक्यातील मारफळा येथील 52 वर्षीय शेतकर्‍याने आत्महत्या केली. या शेतकर्‍याकडे भारतीय स्टेट बँकेचे 2लाख 70 हजाराचे कर्ज होते. या कर्जाला कंटाळून शेतकर्‍याने आपले जीवन संपवले आहे. या घटनेने मारफळा येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

मराठवाड्यात सर्वात जास्त आत्महत्या बीड जिल्ह्यामध्ये होत आहेत. नापिकी, कर्जबाजारीपणा या कारणामुळे शेतकरी आत्महत्या करतात. गेवराई तालुक्यातील मारफळा येथील भिमराव देवराव कुटे (52) या शेतकर्‍याकडे भारतीय स्टेट बँकेचे 2 लाख 70 हजार रूपये कर्ज होते. या कर्जाची परतफेड कशी करायची? या चिंतेतुन शेतकर्‍याने लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. घटनेची माहिती पोलिस प्रशासनाला झाल्यानंतर तलवाडा ठाण्याचे कुवारे, गायकर यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.
 

Advertisement

Advertisement