परळी वैजनाथ (प्रतीनिधी) - आषाढी एकादशी यात्रे निमित्ताने पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या लक्षात घेता मराठवाड्यातील नांदेड, जालना, औरंगाबाद या तीन प्रमुख रेल्वे स्थानकांवरून पंढरपूरपर्यंत विशेष यात्रा स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला असल्याची माहिती नांदेड रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी दिली आहे.
मराठवाड्यातून आषाढी एकादशीच्या होणा-या पंढरपूर येथिल यात्रे निमीत्ताने श्री विठुरायाच्या दर्शना करिता हजारोंच्या संख्येने वारकरी यात्रेकरू जातात. एस.टी.महामंडळ याकरीता अतिरीक्त बसेस उपलब्ध करून देते.महामंडळा पाठोपाठ आता रेल्वेही वारक-या सेवेसाठी मैदानात उतरली आहे
नुकतीच रेल्वे मंत्रालयाने विठ्ठल दर्शनासाठी जालना, औरंगाबाद, नांदेड रेल्वे स्थानकावरुन तीन यात्रा स्पेशल विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे.यात्रा महोत्सव दरम्यान रेल्वेने जालना, नांदेड आणि औरंगाबादहून पंढरपूर ये-जा करण्यासाठी दि.९ जुलै पासून ही सेवा सुरू केली आहे.
➢ गाडी क्रमांक ०७४६८ जालना –पंढरपूर– जालना विशेष रेल्वे जालना स्थानकावरून ९ जुलै रोजी सायंकाळी ७;२० वाजता सुटून परभणी,परळी वैजनाथ,लातुररोड मार्गे पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६:३० वाजता पोहोचेल. परतीच्या दिशेने ही गाडी गाडी १० जुलै, 2022 रोजी रात्री ८;३० वाजता पंढरपूर स्थानकावरून सुटेल आणी सकाळी १० वाजता जालन्याला पोहोचेल.या गाडीत वातानुकुलीत, द्वितीय शय्या (स्लीपर), जनरल असे 13 डब्बे असतील.
➢ गाडी क्र०७५१५ औरंगाबाद -पंढरपूर- औरंगाबाद ९ जुलै रोजी औरंगाबाद स्टेशनवरून रात्री९;४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११;३० वाजता परभणी,परळी वैजनाथ,लातुररोड मार्गे पंढरपूरला पोहोचेल. परतीच्या दिशेने गाडी पंढरपूर स्टेशनवरून १० जुलै रोजी रात्री ११ वाजता निघूल दुसऱ्या दिवशी १२;२० वाजता औरंगाबादला पोहोचेल.१७ डब्यांच्या या गाडीलि द्वितीय शय्या (स्लीपर), जनरल असे डबे असणार आहेत.
➢ गाडी संख्या ०७४९८ नांदेड –पंढरपूर–नांदेड विशेष रेल्वे नांदेड स्थानकावरून ९ जुलै रोजी दुपारी ३ वाजता सुटेल, दुसऱ्या दिवशी सकाळी १०:३५ वाजता पूर्णा, परभणी,परळी वैजनाथ,लातुररोड मार्गे पंढरपूरला पोहोचेल. परतीच्या दिशेने गाडी पंढरपूर स्टेशनवरून १०जुलै रोजी रात्री ९:३० वाजता निघून आणि दुसऱ्या दिवशी सायं ६;५० वाजता नांदेडला पोहोचेल.या गाडीत वातानुकुलीत, द्वितीय शय्या (स्लीपर), जनरल असे १८ डब्बे असतील.