Advertisement

कारभारी ढाकणे अनेकांच्या जीवनाचे शिल्पकार-आ. राजळे

प्रजापत्र | Tuesday, 24/05/2022
बातमी शेअर करा

हातगांव-माजी प्राचार्य दिवंगत कारभारी ढाकणे यांच्या व्दितीय वर्षश्रद्धानिमित्त रविवारी (दि.२२) सकाळी ११ वाजता सुधाकर महाराज शास्त्री (भगवान गड संस्थान,श्रीक्षेत्र पैठण) यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाथर्डी शेवगाव मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी कारभारी ढाकणे अनेकांच्या जीवनाचे शिल्पकार ठरले असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

 

 

           माजी प्राचार्य दिवंगत कारभारी ढाकणे यांनी आपल्या हयातीत हजारो विद्यार्थ्यांना घडविले.ते आदर्श शिक्षण म्हणून परिचित होते.विद्यार्थ्यांना घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता, त्यांनी अनेकांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने रूप दिल्याची भावना भाजप आ. मोनिका राजळे यांनी व्यक्त केली. यानंत ढाकणे वस्ती,पैठण-पंढरपूर पालखी मार्गा,हातगांव (ता.शेवगाव) येथे सुधाकर महाराज शास्त्री यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी अहमदनगर दक्षिण भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे,पाथर्डी पंचायत समितीचे सभापती व उद्योजक गोकुळ दौंड, जिल्हा परिषद अहमदनगर सदस्य हर्षदा काकडे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश भोसले,जी.पी. ढाकणे,राष्ट्रीय संपर्कप्रमुख वंजारी ओबीसी विकास महासंघ दादासाहेब ढाकणे,डॉ.प्रवीण ढाकणे, प्रशांत ढाकणे यांची उपस्थिती होती.

Advertisement

Advertisement