Advertisement

कार-दुचाकी अपघात

प्रजापत्र | Thursday, 19/05/2022
बातमी शेअर करा

केज दि.१९ - दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने केज अंबाजोगाई रोड हा अपघात प्रवण मार्ग झाल्याचे दिसून येत आहे. आजही दि.१९ रोजी दुपारी केज अंबाजोगाई रोडवरील चंदन सावरगाव जवळ असलेल्या पेट्रोल पंपा नजीक वॅगनार कार आणि दुचाकीच्या अपघातात एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

 

              केज अंबाजोगाई रोडवरील भाटुंबा पाटीवर असलेल्या नायरा पेट्रोल पंपा जवळ दुपारी 4 च्या दरम्यान वॅगनार कार आणि स्प्लेंडर मोटारसायकलची धडक झाली.त्यात मोटारसायकल वरील एकजण गंभीर जखमी झाला आहे. सदर अपघाताची माहिती मिळताच 108 चे पायलट मकरंद घुले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला केजच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु अपघातात मोटारसायकल चालक जास्तच गंभीर असल्याने त्यास पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे पाठवण्यात आले आहे. सदर अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सदर जखमी जवळबन ता.केज येथील रंजित कळेकर असल्याची माहिती मिळाली आहे.

Advertisement

Advertisement