Advertisement

अजितदादांनी शब्द दिला होता, तो पूर्ण केला: पालकमंत्री सुनेत्रा पवार

प्रजापत्र | Thursday, 17/09/2026
बातमी शेअर करा

बीड दि.१७(प्रतिनिधी): अजितदादांनी बीडकरांना दिलेला शब्द पाळण्याचे भाग्य मला मिळाले. गतवर्षी दादांनी एक आठवण करून दिली होती की, जेव्हा ते पहिल्यांदा लोकसभेत खासदार म्हणून गेले तेव्हा बीडच्या रेल्वेचा प्रस्ताव मंजूर झाला होता. बीडचा विकास आणि बीडची कनेक्टिव्हिटी हाच आपला एकमेव ध्यास आहे. बीडची पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला शब्द देते, मीदेखील अधिकाऱ्यांकडून काम करून घेणार, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. 
    मराठवाड्याशी थेट पुण्याला जोडणाऱ्या बीड-पुणे रेल्वेचा राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. मान्यवरांकडून या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर बीडमधून पहिल्यांदाच पुण्यासाठी रेल्वे धावली. सुनेत्रा पवार यांनी बीडमधील रेल्वेच्या प्रवाशाच्या आठवणी सांगत बीडकरांना नव्या रेल्वेसाठी शुभेच्छा दिल्या. 

Advertisement

Advertisement