Advertisement

मनोज जरांगे मुंबईकडे रवाना

प्रजापत्र | Tuesday, 15/09/2026
बातमी शेअर करा

 जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे अखेर मोजक्या सहकाऱ्यांसह मुंबईकडे रवाना झाले आहेत. मंगळवारी सकाळी आरोग्य तपासणी झाल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि गावातील दोन मंदिरांत दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले. उपोषणाचा १८ वा दिवस असताना जरांगे पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यांचे हे ११ वे उपोषण असणार असून, मुंबईकडे जाण्याची त्यांची ही तिसरी वेळ आहे.

Advertisement

Advertisement