Advertisement

मळणी यंत्रात अडकून महिलेचे शिर झाले धडावेगळे

प्रजापत्र | Thursday, 12/05/2022
बातमी शेअर करा

गेवराई-तालुक्यातील कुंभेजळगांव येथे एका ३० वर्षीय विवाहित महिलेचा तोल गेल्याने मळणी यंत्रात अडकून शिर धडा वेगळे झाल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (दि.१२) दुपारी समोर आली आहे.
        सावित्री सुदाम पांगरे (वय-३०) असे त्या मृत महिलेचे नाव आहे.आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास बाजरीचे खळे मळणी यंत्राद्वारे चालू होते. मळणी यंत्रात बाजरी टाकत असतांना सावित्री पांगरे यांचा तोल गेला असता त्यांना मळणी यंत्राने आतमध्ये ओढले. यावेळी सावित्री पांगरे यांचे शिर धडा वेगळे झाले. यात त्यांचा जागीच मृत्यु झाला. या घटनेमुळे कुंभेजळगांव  गावात हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात अपघाताची शृंखलाच सुरु आहे. रस्ते अपघातात चार दिवसांत आष्टी, गेवराई, परळी, केज व धारुर तालुक्यात जवळजवळ आठ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. बुधवारी रात्री आष्टी तालुक्यात बीडच्या प्रतिष्ठित व्यापारी असलेल्या टेकवाणी कुटूंबातील चौघांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. यातच आज मळणी यंत्रात गेल्याने महिला दगावल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Advertisement

Advertisement