Advertisement

कुमावतांनी आवळल्या वाळू माफियांच्या मुसक्या

प्रजापत्र | Monday, 02/05/2022
बातमी शेअर करा

गेवराई (प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील संगम जळगांवच्या गोदापात्रात साहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने रात्रीच्या सुमारास छापा टाकला या कारवाईत त्यांनी आठ ट्रॅक्टर व ३ पोकलेन, २ जेसीबी ताब्यात घेत जवळपास दोन कोटींचा मुद्देमाल जप्त केला असल्याचे सांगण्यात आले.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, साहय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांना गेवराई तालुक्यातील संगम जळगाव याठिकाणी असर्नाया गोदापात्रात अवैध बाळू उत्खनन करून त्यांची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून त्यांनी काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास छापा मारला व आठ ट्रॅक्टर व ३ पोकलेन, दोन जेसीबी ताब्यात घेत जवळपास एकूण २ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती असुन सदर जप्त केलेली वाहने गेवराई पोलिस ठाणे या ठिकाणी पुढील कार्यवाईसाठी लावण्यात आली आहेत.

Advertisement

Advertisement