गेवराई दि.१६ (वार्ताहर)-बीड-औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्गावर गेवराई शहराच्याजवळ रस्ता ओलाडत असतांना बिबट्याला एका अज्ञात ट्रकने उडवल्याने त्याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना आज सांयकाळी ८ च्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली असून वनविभागाचे पथक थोड्यावेळात त्या ठिकाणी दाखल होणार असल्याची माहिती आहे.
बीड-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग गेवराई बायपास वरील भारत पेट्रोलियम पंपासमोर रस्ता ओलाडत असतांना एक बिबट्याला ट्रकने उडवल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला असून घटनास्थळी नागरिकांनी मृत बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली आहे.
बातमी शेअर करा