गेवराई-तालुक्यातील निपाणी जवळका येथे जोतिबा महाराज यांची यात्रा दरवर्षी भरते.कोरोनामुळे मागील दोन वर्ष या यात्रेवर निर्बंध होते मात्र यंदा निर्बंध हटविण्यात आल्यामुळे गावात यात्रेनिमित्त जय्यत तयारी सुरु होती.यावेळी देवाला अभिषेक घालण्यासाठी राजापूर गोदापात्रातून पाणी आणत असताना तोल गेल्याने दोघांचा बुडून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि.१५) रात्री १२ च्या सुमारास घडली.
शिवाजी ज्ञानदेव इंगोले (वय-१८) व मोहन नाना आतकरे (वय-१८) (रा.दोघे ही निपाणी जवळका) असे मृत तरुणांचे नावे आहेत.जोतिबा महाराज यांच्या यात्रेच्या एक दिवस आधी मंदिरात गोदावरीचे पाणी कावडीत आणून अभिषेक घालायची पंंरपरा अनेक वर्षांपासून चालू आहे.याच पंरपरेनूसार पाणी आणण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाण्यात तोल जाऊन पडल्याने बुडून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.दरम्यान रात्री उशिरा या दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
बातमी शेअर करा