परळी वै.दि.३० (वार्ताहर)-राणी लक्ष्मीबाई टाॅवर चौकातील एका तरुण व्यावसायिकांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.३०) दुपारी घडली आहे.
राणी लक्ष्मीबाई टाॅवर चौकातील पानपट्टी व्यावसायिक आकाश चंद्रकांत चव्हाण (वय-२७ रा.परळी वैजनाथ) या युवकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.दुपारी १ वाजेपर्यंत आकाश पानपट्टीवर होता.दररोजच्या प्रमाणे वडिलांना पानपट्टीवर बसवुन तो घरी जेवणासाठी गेला. घरुन नेहमीच्या वेळेप्रमाणे तो परत आला नाही म्हणून वडीलांनी त्याच्या मोबाईलवर फोन केले मात्र फोन उचलला गेला नाही.काही वेळाने घरुन फोन आला की, आकाश त्याच्या रुमचा दरवाजा उघडत नाही.त्यानंतर वडील घरी गेले असता आकाशने गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे दिसून आले. उत्तरीय तपासणीसाठी परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्याने आत्महत्या का केली?याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.दरम्यान, अतिशय शांत,संयमी व सर्वपरिचित असणारा हा युवक आत्महत्या करेल असे कोणालाच वाटले नाही.मात्र त्याने केलेल्या आत्महत्येने त्याला ओळखणारे,त्याचे मित्र,टाॅवर चौकातील व्यावसायिक सर्वांना एक प्रकारे धक्का बसला आहे.त्याच्या आकस्मिक मृत्यूने सर्वस्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
बातमी शेअर करा