परळी - ग्राहक सेवा केंद्राला परवानगी देतो असे म्हणुन कर्नाटकातील तिघांनी परळी तालुक्यातील रामेश्वर मुंडे यांच्याकडुन १ लाख २७ हजार ५०० रूपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
परळी तालुक्यातील लोणारवाडी येथील रामेश्वर मुंडे यांना गतवर्षी ५ नोव्हेंबर रोजी दोन मोबाईल क्रमांकावरून फोन आले आणि त्यावरून बोलणाऱ्या भामट्यांनी ग्राहक सेवा केंद्र सुरु करा असा प्रस्ताव त्यांना दिला. मुंडे यांनी होकार दर्शविताच त्या भामट्यांनी कंपनीकडे पैसे जमा करण्यास सांगितले. सहा विविध व्यवहारातून त्यांनी रामेश्वर यांच्याकडून १ लाख २७ हजार ५०० रूपये जमा करून घेतले आणि युजर आयडी, पासवर्ड दिला. रामेश्वर यांनी त्यावर लॉगीन होऊन पहिले असता त्यांना त्यांचे सर्व डिटेल्स दिसू लागले. त्यापुढील प्रोसेस चालू ठेवण्यासाठी त्या भामट्यांनी आणखी रकमेची मागणी केली. या प्रकरणी मुंडे यांच्या फिर्यादीवरून विवेकानंद कुमार, रवि कुमार, संजीव कुमार (रा.बँगलोर, कर्नाटक) या तिघांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.