गेवराई -येथील पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने शुक्रवारी (दि.२५) दुचाकी चोरांना ताब्यात घेऊन मोठी कारवाई केली आहे.या दोन चोरट्यांकडून पोलिसांनी तब्ब्ल १८ मोटारसायकल जप्त केल्या.यामध्ये १५ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
मोबीन शेख (रा.गेवराई) व मोहंमद शफी मोहंमद अंन्सारी (रा.भिंवडी,मुंबई) अश्या दोन चोरट्यांची नावे आहेत.मोहंमद शफी मोहंमद अंन्सारी याने ठाणे,भिवंडी,पुणे येथून दुचाकी चोरत त्या विक्रीसाठी गेवराईत आणल्या होत्या.याची माहिती डीबी पथकाचे प्रमुख सहा पोलिस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी शहरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा मारत १८ मोटारसायकल ताब्यात घेतल्या.यावेळी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून यात १५ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.दरम्यान या चोरटयांनी अनेक दुचाकींची चोरी करून विक्री केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.उद्या (दि.२६) गेवराईच्या न्यायालयात आरोपींना हजर करण्यात येणार असल्याची माहिती सहा पोलिस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांनी दिली.