परळी-येथील रेल्वे स्थानक परिसरामध्ये आज (दि.२५) सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे.घटनास्थळी संभाजीनगर पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पांडुरंग लोहार (वय -५५ रा.पानगाव, जि. लातूर) असे मयताचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी रेल्वे स्थानकातील प्रवाशांना पांडुरंग हे मृतावस्थेत आढळून आल्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली.दरम्यान सदरील इसमाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयाकडे पाठविण्यात आला असून मृत्युचे कारण अद्याप समोर आले नव्हते.संभाजी नगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
बातमी शेअर करा