परळी दि.19 (वार्ताहर) : परळी नजीक असलेल्या वसंतनगर येथील उसतोड मजुराचा र्हदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यु झाला. शनिवारी (दि.19) दुपारी 2:30 वाजता बापाचा अंतविधी करून मुलाने वैद्यनाथ कॉलेजमध्ये बारावीची परिक्षा दिली.
वसंतनगर येथील बालाजी गणपत राठोड (वय-40) हे शुक्रवारी (दि.18) होळी सणा निमित्त वसंतनगर येथे आले होते. दुपारी पाच च्या दरम्यान किनगाव परिसरात उसतोडणी चालु असलेल्या फडात निघुन गेले. सर्व उसतोड मजुर थांबलेल्या ठिकाणी गेल्यानंतर रात्री 9 च्या सुमारास र्हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. बालाजी राठोड यांच्यावर शनिवारी (दि19) वसंतनगर येथे दुपारी 2:30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. पहिला मुलगा राजेश हा बारावीची परिक्षा देत आहे. शनिवारी (दि19) दुपारी 3:00 वाजता वैद्यनाथ महाविद्यालयात बारावीचा पेपर असल्याने अंत्यविधी झाल्यानंतर बापाच्या मृत्युचे दुःख पचवून परिक्षा दिली. राजेश राठोडवर बारावीच्या परिक्षेचे ओझे असतानाच बापाच्या मृत्युचे दुःख असल्याने उपस्थित असलेल्या सर्वांचे डोळे पाणावले होते.