गेवराई - सर्वत्र धुलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना गेवराई तालुक्यातील आगरनांदूर येथील एका युवकाने व्हाट्सअपवर स्टेटस ठेऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्देवी घटना दि.18 मार्च रोजी गेवराई तालुक्यातील आगर नांदूर येथे घटना घडली.
नितीन चिमाजी निर्मळ (23) असे मयताचे नाव आहे. आगर नांदूर येथील नितीन हा धुलीवंदनाच्या दिवशी गावात होता.मात्र त्याच्या काही मित्राने त्याचे व्हाट्सअप स्टेटस पाहिले असता त्याने आपल्या व्हाट्सअपवर ‘आय मीस यु, माय लव्ह मिस यु फ्रेंड, बाय, माय जिगरी, सॉरी शेवट’, अशा प्रकारचे स्टेटस ठेवले होते.त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता गावाजवळील गायरानातील एका लिंबाच्या झाडाला त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. गावकर्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. नंतर उपनिरीक्षक प्रफुल्ल साबळे व बिट अंमलदार हंबरडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करत मृतदेह शवविदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. व्हाट्सअपवर ठेऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.मात्र त्याने आत्महत्या का केली याचा तपास चालू आहे.त्याच्या पश्चात आई वडील,एक भाऊ,दोन बहिणी असा परिवार आहे.या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.