परळी वै-लातुर येथील शोरुम मधून आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करुन पुस मार्गाने परळीकडे येत असतांना नंदागौळ-पुस दरम्यान शुक्रवारी राञी १ वाजण्याच्या सुमारास धावत्या कारने अचानक पेट घेतल्याचे घटना समोर आली आहे.या आगीत कार जळून खाक झाली असून यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शुक्रवारी आपल्या किया (Kia) नावाच्या गाडीची लातुर येथील शोरुममधून सर्व्हिसिग करुन परळीकडे राञी निघाल्यानंतर पुस ते नंदागौळ दरम्यान रस्त्यावर अचानक या कारने पेट घेतला.यानंतर कारमधील प्रवाशांनी तात्काळ परळी नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला संपर्क साधला.अग्निशामक दल घटनास्थळी जाईपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.गाडीत प्रवास करणारे चौघेही बचावले आहेत.
बातमी शेअर करा