गेवराई : किरकोळ वादातून एका ३४ वर्षीय तरुणावर आज्ञात तीन जणांनी प्राणघातक हल्ला केला. तीश्न हत्याराने सपासप वार करुन हल्लेखोर पसार झाले आहेत. हि घटना गेवराई जवळील जातेगाव रोडवर सोनवडी फाटा येथे आज पाच वाजण्याच्या सुमारास घडली असून मोठी खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर संजय तेलुरे (वय ३४ वर्ष ) रा. सिराळा ता. गेवराई असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव असून प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते.
याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर संजय तेलुरे हा तरुण गेवराईकडून स्वतःच्या मोटारसायकलने आपल्या गावांकडे परत जात असतांना जातेगाव रोडवरील सोनवाडी फाट्यावर त्याला मद्यपान करनाऱ्या तीन लोकांनी बीसलरीची बॉटल फेकून मारली. दरम्यान ती बॉटल का मारली ? याचा जाब ज्ञानेश्वर याने विचारल्याने मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तीन तरूणांनी त्यांच्याकडे असलेल्या तीश्न हत्याराने ज्ञानेश्वर याच्या अंगावर सपासप वार करण्यास सुरुवात केली.
यानंतर ज्ञानेश्वर हा रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच हल्लेखोर पसार झाले. हि घटना आज 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती कळताच घटनास्थळी मोठा जमाव जमा झाला होता. जखमी तरूणाला गेवराईच्या खाजगी रूग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबाद याठिकाणी हलवण्यात आली असल्याची माहिती आहे. सदरील तरूणाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.