Advertisement

गोदापात्रात कुमावतांची मोठी कारवाई

प्रजापत्र | Wednesday, 16/03/2022
बातमी शेअर करा

गेवराई-तालुक्यातील खामगांव परिसरातील गोदापात्रात  आज (दि.१६) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी आपल्या पथकासह गोदापात्रात छापा मारून तीन हायवा , एक मोठा ट्रक , वाळू उपसा करणारे रोटर ,केन्या असा 1 ते दीड कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

  गेवराई तालुक्यातील खामगांव व शहागडच्या पुलाखाली दररोज हजारो ब्रास वाळू उपसा करून त्यांची तस्करी केली जात असल्याची माहिती पंकज कुमावत यांना मिळाली. त्यांनी सदर प्रकणाची खातरजमा करून आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास खामगांव गोदापात्र शिवारात त्यांनी आपल्या पथकासह छापा मारला. या कारवाईत तीन हायवा , एक मोठा ट्रक , वाळू उपसा करणारे रोटर , वाळू उपसा करणाऱ्या केन्या असा एक ते दीड कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

Advertisement

Advertisement