Advertisement

जिरेवाडी खूनप्रकरणी आरोपीला अटक

प्रजापत्र | Sunday, 13/03/2022
बातमी शेअर करा

परळी वै-परळी लगतच्या जिरेवाडी येथील वृध्द शेतकरी भाऊ-बहिणीच्या खून प्रकरणी परळी ग्रामीण पोलीसात अज्ञात व्यक्ती विरूध्द गुन्हा नोंद झाला होता.दरम्यान ग्रामीण पोलिसांनी अखेर याप्रकरणी आज मयत वृद्धाच्या मुलास अटक करून न्यायालयात हजर केले.दरम्यान घरगुती कारणातुन स्वतःच्या वडील आणि आत्याचा खून आरोपीने केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

    जिरेवाडी येथील सटवा ग्यानबा मुंडे (वय-७४) व सुभ्राबाई ग्यानबा मुंडे (वय-७०) या शेतकरी बहीण भावाचा शेतात दि २४ फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीसात भाउसाहेब दादाराव कराड यांच्या फिर्यादी वरून अज्ञात आरोपी विरूध्द गु. र. नंबर ४६/२०२२ कलम ३०२ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. घटना घडली त्यावेळी अंबाजोगाई विभागाच्या अप्पर पोलीस अधिक्षक कवीता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल जायभाये परळी ग्रामीणचे प्रभारी सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक शरद भुतेकर यांनी भेटी देऊन पंचनामा केला. 

 

    दरम्यान या प्रकरणी मयत सटवा ग्यानबा मुंडे यांचा मुलगा तुकाराम सटवाजी मुंडे यास ग्रामीण पोलिसांनी अटक करून रविवार दि 13 रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Advertisement

Advertisement