Advertisement

शेतकर्‍याला 14 लाखाला गंडा

प्रजापत्र | Wednesday, 09/03/2022
बातमी शेअर करा

परळी : केंद्र सरकारकडुन सबसिडीचा लिंबु प्रक्रिया उद्योग मंजुर करून देतो असे म्हणुन संस्थेचे कागदपत्र मागवुन फोन पे वर 14 लाख 5 हजार रूपये घेवुन फसवणुक केल्याचा प्रकार परळी तालुक्यातील सारडगाव येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी शेतकरी प्रदिप शत्रुघ्न तांदळे यांच्या फिर्यादीवरून बुधवारी (दि.९) नाशिक येथील मनिषा देविदास तंवर, स्मिता पांडुरंग बोडके या दोघांविरूध्द परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 420,468,471,120 (ब),506,34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास सपोनि शहाणे करीत आहेत.

Advertisement

Advertisement