परळी-धर्मापुरी रोडवर सिमेंट कंपनीपासून ५०० मीटर अंतरावर रोडलगत असलेल्या शेतात कुजलेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना रविवार (दि.२७) उघडकीस आल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे.
परळी-धर्मापुरी रोडवरील वीर ढाबाजवळ असलेल्या ज्वारीच्या शेतात पुरुष जातीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.सदरील घटना घडून अनेक दिवसाचा कालावधी झालेला संशय पोलिसांनी व्यक्त केला असून पूर्ण मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला असून एक हात व एक पाय ओळखू येण्याच्या अवस्थेत असल्याने उत्तरीय तपासणी देखील घटनास्थळी करावे लागणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे.नेमका हा प्रकार काय आहेत? याचा शोध घेण्याचे आवाहन पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.घटनास्थळी परळी शहर व ग्रामीण पोलीस पाण्याचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहे.
सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात
परळी तालुक्यात गत तीन दिवसांत तिघांच्या हत्या झाल्या आहेत. त्यानंतर आज आणखी एक संशयास्पद मृत्यूचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. धारावती तांडा येथे सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली नव्हती. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण समोर येईल. दरम्यान, परिसरातील हॉटेलवरील सीसीटिव्ही तपासण्यात येत असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.