गेवराई/तलवाडा-शहरातील इस्लामपूर चौकातील जहागीर कॉम्प्लेसमधील दोन दुकाने,गॅरेज लाईन परिसरातील एक दुकान आणि तलवाडामधील दोन मेडिकल अज्ञात चोरटयांनी फोडून हजारोंचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी (दि.२७) समोर आली आहे.बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांसमोरील आव्हान दिवसेंदिवस कठीण होत चालल्याचे चित्र आहे.
गेवराई शहरातील इस्लामपूर चौकातील जहागीर कॉम्प्लेसमधील गुरूकृपा ज्वेलर्स व एक कपड्याच्या दुकानाचे शटर फोडून चोरटयांनी ८० हजारांचा ऐवज लंपास केला.यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील गॅरेज लाईन परिसरातील इंण्डिया आटो मोबाईल या दुकानांचे शटर तोडून यातील काही साहित्य लंपास केले.तसेच तलवाडामधील यात्रा परिसरातील एस.के. दवाखान्यातील मेडिकलचे अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून गल्ल्यातील दोन ते तीन हजार रुपये लंपास केले.तर बाजार रोडमधील किरण मेडिकलमध्ये ही चोरी करण्यात आली असून या ठिकाणी गल्लतील ५०० रुपये व काही कागदपत्र लंपास करण्यात आले.दरम्यान शनिवारी मध्यरात्री या चोरीच्या घटना घडल्या असून रविवारी सकाळी हा प्रकार समोर आला.गेवराई तालुक्यात एकाच रात्री पाच ठिकाणी दुकान फोडण्यात आल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
बातमी शेअर करा