Advertisement

सिरसदेवीत भावंडांवर तलवारीने सपासप वार

प्रजापत्र | Sunday, 27/02/2022
बातमी शेअर करा

सिरसदेवी-जुन्या भांडणाची कुरापत काढून शनिवारी रात्री १ च्या सुमारास झोपेत असलेल्या सख्खा चुलत भावंडांवर तलवारीने सपासप वार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. 

 

                 

शेख समीर शेख अमीन हे आपल्या शेतात झोपलेला असताना रात्री एकच्या सुमारास शेख रईस शेख इसुफ ,शेख अनिस, शेख इनुस इसुफ या तिघांनी जुन्या भांडणाच्या कुरापतीतुन शेख समीरवर तलवारीने सपासप वार केले.यामध्ये त्यांच्या मानेवर, पायावर, पोटावर, हातावर जखमा झाल्या आहेत.हल्ल्यानंतर समीर शेख यांनी आरडाओरड केल्यानंतर त्यांच्या मदतीला आलेल्या शेख जावेद शेख वाहेद या भावावरही तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने खळबळ उडाली असून शेख समीर यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
 

Advertisement

Advertisement