गेवराई-वाळू उपसा झालेल्या खड्ड्यात बुडून चार ऊसतोड मजुरांच्या मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील शहजाणपूर चकला येथे घडली होती. याप्रकरणी चार वाळू माफियांवर गुन्हा दाखल करण्यात आले असून यातील एका आरोपीला पोलिसांनी पाचोड येथून अटक केली आहे.
बीड जिल्ह्यात चार मुलांचा मृत्यु झाल्यानंतर खळबळ उडाली होती.आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी नागरिकांमधून दबाव वाढत होता.घटनेच्या चार दिवसानंतर पोलिसांनी याप्रकरणी चार वाळू माफियांवर गुन्हे दाखल करण्यात केले होते.यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली असताना रविवारी (दि.१३) संदिपान हनुमान निर्मळ (रा.तांदळवाडी वय-२८) याला पाचोड येथून गेवराई पोलिसांनी अटक केली आहे.याप्रकरणात अजून पांडूरंग चोरमले, विलास निर्मळ, अर्जुन कोळेकर (सर्व रा.तांदळवाडी) फरार असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.