Advertisement

मृतावस्थेत आढळला बिबटया

प्रजापत्र | Friday, 11/02/2022
बातमी शेअर करा

बीड :  आज सकाळी जिल्ह्यातील राक्षसभुवन येथे ओढ्याच्या परिसरात बिबट्या दिसला पण तो मृतावस्थेत त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

 

गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन शिवारातील एका ओढ्यात आज दुपारी बिबट्या ग्रामस्थांच्या नजरेस पडला. बिबट्याला पाहाताच मनाचा थरकाप उडाला, पण आडोशाने अंदाज घेवून निरीक्षण केल्यास तो  कांहीच हालचाल करीत नव्हता. घटनास्थळी अनेकांना फोन करून बोलावून घेतले. ते सर्वजण लाठ्याकाठ्या घेऊन ओढ्याच्या दिशेने धावले. 

 हिंमत दाखवित तरुण त्याच्या जवळ गेले असता तो मृतावस्थेत होता. याची गावात माहिती मिळताच ग्रामस्थांनी बिबट्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली. परंतु या बिबट्याचा मृत्यु कशामुळे झाला. यामागील कारण काहीच स्पष्ट झाले नाही. दुपारी याबाबत वनाधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. ते आता यामागील कारण शोधून काढतील. परंतु मृतावस्थेत बिबट्या आढळल्याने एकच खळबळ उडाली असून, या परिसरात बिबट्याचा वावर होता हे निश्चित झाले आहे.

Advertisement

Advertisement