गेवराई दि.6 (वार्ताहर) : तालुक्यातील शहाजानपूर चकला येथे वाळूच्या पाणी असलेल्या खड्ड्यात बुडून चौघांचा मृत्यु जायाची घटना रविवारी (दि.6) सायंकाळी 5 च्या सुमारास घडली. गेवराई तालुक्यात वाळु बळींची संख्या अलीकडे मोठ्या प्रमाणावर वाढली असताना प्रशासन मुग गिळून गप्प आहे. वाळू माफियांनी वाळू काढण्यासाठी जी खड्डे केली होती. त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठले आणि या पाण्यात बुडून या चौघाचंा दुर्दैवी मृत्यु झाला.
अमोल संजय कोळेकर (वय 12), बबलू गुणाजी वक्ते (वय13), आकाश राम सोनवणे (वय11), गणेश नामदेव इनकर (वय13) या चौघांचा मृत्यु झाला आहे. सिंदफना नदीत मागील अनेक वर्षांपासून वाळूचा सर्रास उपसा सुरु आहे. या ठिकाणी वाळू माफिये प्रशासनाला हाताशी धरुन वाळूची बेसूमार विक्री करत आहेत. दरम्यान शहाजानपुर चकला येथे वाळूसाठी जी खड्डे खांदण्यात आली होती त्यात पाणी साठले आणि यातच बुडून चौघांचा दुर्दैवी मृत्यु झाला. नदीकाठी खेळायला गेलेल्या या चौघांच्या मृत्युने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान राक्षसभूवन येथे केणी डोक्याला लागल्याने एकाचा मृत्यु झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी आणखी चौघे वाळू माफियांमुळे दगावली आहेत. दरम्यान सध्या गावामध्ये तणावाचे वातावरण असून प्रशासन कधी जागे होणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.