Advertisement

वाईन विक्रीविरोधात गेवराई कडकडीत बंद

प्रजापत्र | Friday, 04/02/2022
बातमी शेअर करा

              
गेवराई :- शासनाने शेतकरी हिताचे कारण पुढे करून किराणा व सुपर मार्केट मध्ये वाईन विक्री ची परवानगी देण्याचा निर्णय घेतला असून याबाबत गेवराई वाईन विरोधी एकीकरण समिती व व्यापारी महासंघाच्या वतीने तीव्र निषेध करत आज सर्व व्यापार्‍यांनी शहरात कडकडीत बंद पाळला असून याला विविध व्यावसायिक व सामाजिक संघटनांनीही पाठींबा दिला आहे.
             शासनाने पुढील पिढी घडवण्यासाठी काय करायला हवे याकडे लक्ष देण्याऐवजी तरुण पिढी बरबाद करण्यासाठी किराणा दुकानात वाईन विक्रीसाठी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे का.? असा सवाल उपस्थित करत आज सकाळपासून पूर्ण शहरातील दुकाना व व्यवसाय बंद ठेवून या निर्णयाबाबत शासनाचा तीव्र निषेध केला. दरम्यान या बंद मध्ये व्यापारी महासंघ, गेवराई किराणा संघटना, सकल जैन समाज संघटना, दिगंबर जैन समाज संघटना, कपडा व्यापारी संघटना, सराफा असोशियशन, वर्धमान स्थानकवासी संघ, आसरा फाउंडेशन, स्टेशनरी व कटलरी संघटना, बजरंग दल आदी संघटनांनी या बंदला पाठींबा देत शुक्रवारी सकाळपासून शहरात कडकडीत बंद पाळत शासनाचा जाहीर निषेध केला

Advertisement

Advertisement