बीड : गेवराईचे माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांची कोरेाना चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानूसार त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे शिवछत्र परिवाराने कळविले आहे.
माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली चाचणी करुन घ्यावी असे आवाहनही शिवछत्र परिवराने केले असून अमरसिंह पंडित यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.
बातमी शेअर करा