Advertisement

मोटारसायकलच्या धडकेत महिला ठार

प्रजापत्र | Sunday, 02/01/2022
बातमी शेअर करा

गेवराई : भरधाव वेगातील मोटारसायकलने रस्ता क्राँस करणाऱ्या एका महिलेला जोराची धडक दिली. यामध्ये सदरील महिला जागीच ठार झाली, तर दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. यामधील एका जणाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. हि घटना गेवराई तालुक्यातील अर्धमसला फाटा येथे शनिवारी रात्री साडेसात वाजता घडली. बबिता नवनाथ कुरे (वय ५५ वर्षे) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

 

 

गढीकडून माजलगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी (एम.एच. २० इ.एच.१८५०) ने अर्धमसला फाटा येथे रस्ता क्राँस करणाऱ्या बबिता कुरे यांना जोराची धडक दिली. यामध्ये बबिता कुरे या जागीच ठार झाल्या. तर दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सदरील दुचाकीस्वार हे औरंगाबाद जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जाते. दरम्यान जखमींना गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून यामधील एका जणाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

Advertisement

Advertisement