Advertisement

२५ हजार वृद्धांसाठी 'श्रावणबाळ ' व्हायला प्रशासनाला वेळ नाही गेवराईत अडीच वर्षात बैठकच नाही

प्रजापत्र | Thursday, 01/10/2020
बातमी शेअर करा

अविनाश इंगावले

गेवराई : गेवराई तालुक्यात संजय गांधी व श्रावणबाळ निराधार योजनेवरून लाभार्थी यांचा विश्वास उडाला आहे गेल्या अडीच वर्षापासुन या योजनेची बैठक घेण्यास तहसिलदार यांना वेळच मिळाला नाही त्यामुळे तब्बल २५ हजार व्यक्तींचे अर्ज धूळखात पडले आहेत.
 गेवराई तालुक्यात जवळपास चाळीस हजार पेक्षाजास्त लाभार्थी यांना संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतून लाभार्थी अनुदान उचलतात तात्कालीन तहसिलदार संजय पवार यांनी गेल्या अडीच वर्षापुर्वी बैठक घेतली होती त्यानंतर आजपर्यंत याठिकाणी चार तहसिलदार येऊन गेले मात्र या निराधार योजनेकडे त्यांनी पाठ फिरवली असल्याचे दिसुन येत आहे .
 सध्या देश कोरोना सारख्या महामारातून वावरत आहे नागरिक यांची अर्थिक देवानघेवान यांच्यावर यांचा मोठा परिनाम झाला आहे प्रत्येक गरीब श्रीमंत व्यक्ती एकाच रांगेत आहे नेहमी वाळू माफिया यांनी या तालुक्यात हैदोस घातला असल्याचे अनेक उदारने समोर आली आहेत मात्र निराधार यांच्याकडे पुढारी तसेच अधीकारी यांनी देखील दूर्लक्ष केले आहे यामुळे आता निराधारांचे २५ हजार अर्ज निकाली काढण्यास प्रशासनाला मुहूर्त कधी सापडतो याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे

 

Advertisement

Advertisement