Advertisement

बंजारा हॉटेल चालकाकडे हप्ता वसुलीचा प्रयत्न

प्रजापत्र | Sunday, 05/12/2021
बातमी शेअर करा

गेवराई-हॉटेलमध्ये घुसून महिन्याला हप्ता दे असे म्हणत गल्ल्यातील १० ते १२ हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. हॉटेल मालकाला शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना गेवराईतील कोल्हेर रोडवरील बंजारा हॉटेल येथे घडली. याप्रकरणी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

 

              गेवराई येथील कोल्हेर रोडवरील न्यु बंजारा हॉटेलचे चालक कल्याण विठ्ठल जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ७ ते ८ जणांनी हॉटेलमध्ये येवून महिन्याला हप्ता दे असे म्हणत गल्ल्यातील १० ते १२ हजार रूपये काढून घेतले. त्याचबरोबर जाधव यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि सामानाची तोडफोड केली. याप्रकरणी मनोहर चिमाजी चाळक, किशोर प्रभाकर कांडेकर, किशोर आश्रुबा कांडेकर, भरत कचरू सौंदरमल, राम कचरू सौंदरमल, किरण नंदकिशोर गायकवाड, लक्ष्मण कचरू सौंदरमल आणि शिवाजी चाळक यांच्याविरूद्ध गेवराई पोलिस ठाण्यात कलम ३८५, ३८६, ३२७, ३२३, ४२७, ५०४, १४३, १४७, १४९ भा.द.वि.प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पो.उप.नि.काळे हे करीत आहेत.

Advertisement

Advertisement