गेवराई-आठ दिवसापासून गावांचा वीज पुरवठा खंडित असल्याने पीक सुकून जात आहे या निराशेत तरुण शेतकऱ्यांना टोकाचं पाऊल उचलत २३ वर्षीय कृष्णा राजाभाऊ गायके या तरुण शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य पूजा मोरे यांनी या कुटुंबाची भेट घेत. या शेतकऱ्याने आत्महत्या केली नसून महावितरण त्याचा खून केला आहे असा आरोप केला आहे.
अगोदरच अतिवृष्टीने कंबर मोडलेला शेतकऱ्याला आधार देण्याऐवजी महावितरणकडून सक्तीची वीजबिल वसुली केली जात आहे.हेच वसुली शेतकर्याच्या जिवावर उठली आहे.कृष्णा गायके ज्ञानेश शेतात कांद्याचे बी लागवडीसाठी आणले होते. आठ दिवसापासून शेतातील विहिरीत पाणी असताना देखील इतर पिकांना पाणी देता येत नाही आणि कांदा ही लागवड करता येत नाही यातच अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले . याचे अनुदान नाही अजून खात्यावर जमा झालेले नाही. मात्र ७ ते ८ हजार रूपये वीज बिल कुठून बिल कुठून भरायचं ? आठ दिवसात कांदा लागवड केला नाही तर तो पूर्णपणे सडून जातो. त्यामुळे बियाण्यात गुंतवलेले पैसे सुद्धा मिळत नाही. या विवंचनेतुन त्याने आत्महत्या केली.
यावर पूजा मोरे म्हणाल्या, २३ वर्षे शेतकऱ्यांच्या मुलांना आत्महत्या करणे ही दुर्दैवी गोष्ट आहे. मागील दोन वर्षापासून पिक विमा नाही, खरिपाचे उत्पन्न नाही.अतिवृष्टीची मदत नाही. आमचेच शासनाकडे देणे बाकी असताना सरकार येणं रब्बीच्या तोंडावर सक्तीने वीज बिल वसुली करत आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेत त्यांना आधार देण्याऐवजी त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम सरकार करत आहे. १२ दिवसांपासून हे गाव अंधारात आहे. दिवाळी मध्ये देखील गावात वीज नव्हती. अस असताना शेतकऱ्याची उद्विग्न अवस्था होणं साहजिक आहे. त्यामुळे महावितरण वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून तात्काळ वीज वसुली थांबवून कट केलेले कनेक्शन जोडा नसता कोणत्याही क्षणी महावितरण समोर सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पंचायत समिती सदस्य पूजा मोरे यांनी महावितरणला दिला आहे.