शिरूर कासार-बोलणारे कमी आणि काम करणारे जास्त आहे याचा मला खूप आनंद आहे.गावचा विकास करून घेण्यासाठी आता प्रत्येकाने प्रलोभनाच्या आहारी न जाता कामाला लागावे.निवडणुकीचे आव्हान पेलण्यासाठी पूर्ण तयारी करा मतदारांचा विश्वास संपादन करा, घराघरापर्यंत पोहोचा, एकमेकांना मदत करा, सेवेची संधी आहे, ताकद दाखवण्याची हीच ती वेळ आहे, असे आवाहन करत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शिरूर नगर पंचायतसाठी झंझावाती दौरा केला,त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह संचारला होता.
सोमवारी (दि.२९) बीड जिल्ह्यातील शिरूर नगरपंचायतसाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शिरूर तालुक्याचा दौरा केला.यावेळी अरुण डाके, ऍड चंद्रकांत सानप,सुधाकर मिसाळ, अरुण बॉंगाने, सभापती उषा सरवदे,सतीश काटे,सुभाष क्षीरसागर, संजय सानप,प्रकाश इंगळे,अर्जुन गाडेकर,अक्षय रनखांब,सुनील गाडेकर,गोपीचंद गाडेकर,युवराज सोनवणे,दादा तळेकर,सागर केदार,महेश अवसरमल,शेख बाबा शेख काबा,प्रकाश साळवे,मीनाताई उगलमुगले,वैशाली पोपळे, दिलीप बडे,पोपट काका सिरसाट,कलंदर पठाण,यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
क्षीरसागर म्हणाले की,शिरूरची मोठी बाजारपेठ झाली आहे.दळणवळण वाढले आहे,मध्यवर्ती ठिकाण म्हणून आता शिरूरची ओळख होत आहे.शिरूर तालुक्याच्या विकासासाठी आपण सातत्याने आग्रहाची भूमिका ठेवली आहे.अनेक कामांचे प्रस्ताव दाखल करण्यात आलेत सर्वात महत्त्वाचा म्हणजे शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणे महत्त्वाचे आहे.शिरूरमध्ये एकजुटीचे दर्शन घडवले तर निकाल निश्चित आपल्या बाजूने लागेल. उमेदवार निवडताना सर्व बाजू तपासल्या जातील त्या-त्या भागातील नागरिकांचा कौल लक्षात घेऊनच उमेदवार दिल्या जातील. दिलेले उमेदवार विकासासाठी जनसेवेसाठी सोबत राहतील.वीज पाणी आरोग्य सुविधांच्या परीपूर्णतेसाठी चांगले उमेदवार निवडून आले पाहिजेत ताकद दाखवण्याची हीच ती वेळ आहे.मतदानाच्या दिवसापर्यंत मतदारांची मानसिकता तपासाव्ही लागते, प्रलोभनांच्या आहारी न जाता गावचा विकास करून घेण्यासाठी मतदारांनी कौल दिला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.