Advertisement

महावितरणने कनेक्शन तोडले अन शेतकऱ्याने जीव सोडला

प्रजापत्र | Sunday, 28/11/2021
बातमी शेअर करा

चंद्रकांत नवपुते   
गेवराई-तालुक्यातील निपाणी जवळका येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.खरिपाचा हंगाम अतिवृष्टीमुळे हातातून गेला असून शेतकऱ्यांची रब्बीवर मदार आहे.मात्र महावितरणने सरसकट वीज बील वसुली मोहीम हाती घेतल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असताना आता एका २३ वर्षीय शेतकऱ्याने  महावितरणने कनेक्शन तोडताच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याची माहिती आहे.
         कृष्णा राजाभाऊ गायके (वय-२३) असे त्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.सध्या जिल्हाभर महावितरणकडून सक्तीची वीज बील वसुली मोहीम हाती घेण्यात आली असून शेतकऱ्यांना बिल भरा अन्यथा शेतीचा वीज पुरवठा खंडित करू असे सांगितले जात आहे.आधीच अतिवृष्टीमुळे खरिपाचा हंगाम हातातून गेला असताना शेतकऱ्यांची रब्बीवर मदार आहे.मात्र अश्या परिस्थिती महावितरण सक्तीची वीज बील वसुली मोहीम राबवत असल्यामुळे उगवून आलेली पिके वाळून जाऊ लागली आहे,आणि यातूनच गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील कृष्णा राजाभाऊ गायके याने आपल्या शेतातील वीजपुरवठा खंडित होताच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्याच्या नातेवाईकांनी म्हटले आहे.त्याच्या पश्चात आई,वडील,भाऊ,बहीण असा परिवार आहे. दरम्यान गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

Advertisement

Advertisement