शिरुर-तालुक्यातील मांडवगण फराटा येथे दरोडा टाकून एटीएम मशिन पळविणार्या दरोडेखोरांना स्थानीक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफिने जेरबंद केले आहे. या दरोडाखोराने गुन्हयाची कबूली दिली असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
मांडवगण फराटा येथे 7 ऑक्टोंबर रोजी तसेच दौंड तालुक्यातील खडकी येथे 10 ऑक्टोंबर रोजी एटीएम चोरीचे गुन्हे घडले होते. पहाटेच्या सुमारास स्कॉर्पीओ गाडीत येवून एटीएम मशिनसह रोकड लांबवण्यात आली होती.याबाबत शिरुर व दौंड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदरील प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करत होती. तपास करत असतांना काही माहिती पोलीसांच्या हाती लागली. गुन्ह्यात वापरलेली स्कार्पीओ आष्टी बाजूकडे गेली असल्याचे सिसिटिव्ही मध्ये दिसून आले होते. त्यानूसार पोलीसांनी तपास सुरू केला. गून्ह्यातील गाडी हडपसर परिसरातून चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यानूसार पोलीसांनी मल्हारी भिमराव केदार वय-29 रा.शिरुर कासार, बाळासाहे एकनाथ केदार, संभाजी मिसाळ रा.शिरुर या सर्वांना अटक करण्यात आली. या आरोपीतांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे .