Advertisement

भरधाव वेगातील तवेरा गाडीचे टायर फुटल्याने अपघात

प्रजापत्र | Tuesday, 16/11/2021
बातमी शेअर करा

गेवराई : तुळजापूर येथून देवदर्शन करुन नागपुरला जात असताना भरधाव वेगातील तवेरा गाडीचे टायर अचानक फुटल्याने गाडी पलटी झाली. या अपघातात दोन महिला गंभीर तर अन्य एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना मंगळवार दि.16 रोजी सायंकाळी गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक फाटा याठिकाणी घडली.

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, नागपुर येथील काही जण तुळजापूर येथील देवीचे दर्शन करुन नागपुरला (एम.एच 40 एन 7180) या तवेरा गाडीतून होते. दरम्यान या गाडीचे गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक फाटा या ठिकाणी अचानक टायर फुटले, यावेळी चालकास गाडीवरील ताबा सुटल्यामुळे गाडी पलटी झाली. या अपघात सुमित्राबाई यशवंतराव धापोरकर ( वय 60 वर्षे रा. नागपूर ) व कमल दलाल ( वय 55 वर्षे रा. नागपूर ) हे दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. तर चालक प्रवीण यशवंतराव धापोरकर ( वय 35 वर्षे रा. नागपूर ) हे किरकोळ जखमी झाले आहेत. सदरील घटनेची माहिती मिळताच आजूबाजुला असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना मदत केली. तसेच घटनेची माहिती वाहतूक पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला असून जखमींना पुढील उपचारासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात तर गंभीर जखमींना बीड जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement