मुंबई : गेल्या वर्षी दहावी-बारावीची परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या शुल्काचा अंशतः परतावा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
कोरोना महामारीमुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावी परीक्षा रद्द केल्या होत्या. दरम्यान, राज्य मंडळाला मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परीक्षेकरिता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क परत करावे लागणार आहे. यासाठी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची माहिती मागवण्यात आली आहे. त्यासाठी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचा तपशील दहावी-बारावीसाठी mahahsscboard.in, दहावीसाठी https://feerefund.mh-ssc.ac.in आणि बारावीसाठी https://feerefund.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून/लिंकव्दारे नोंदणी करणे आवश्यक आहे.
बातमी शेअर करा