एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलगीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. राज्य सरकारने काही अटी मान्य केल्या आहे. पण, तरीही संघटना आंदोलनावर ठाम आहे.
त्यामुळे आता राज्य सरकारने आज 542 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची धडक कारवाई केली आहे. तर कालही 376 संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती. त्यामुळे राज्यभरात आतापर्यंत 918 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी बेमुदत आंदोलनावर गेले आहे. राज्यातील अनेक डेपो बंद आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या काळात प्रवाशांना अतोनात हाल सहन करावे लागत आहे. या प्रकरणी समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच, हायकोर्टातही या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याची विनंती केली होती. पण, संघटना लेखी आश्वासनाशिवाय मागे हटण्यास तयार नाहीत