Advertisement

ट्रक-मोटारसायकल अपघातात तरुण जागीच ठार

प्रजापत्र | Sunday, 07/11/2021
बातमी शेअर करा

गेवराई - ट्रकला पाठीमागून मोटारसायकलची धडक बसल्याने या झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाला. हि घटना शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास धुळे-सोलापूर महामार्गावरील पाडळसिंगी नजीकच्या एकलिंगेश्वर पंपाजवळ घडली. संतोष नन्नवरे (वय 35) रा.जवाहरवाडी ता.गेवराई असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 

 मयत तरुण संतोष नन्नवरे याचे गढी येथील जयभवानी सहकारी साखर कारखान्यावर ट्रँक्टर लावलेले आहे. दरम्यान शनिवारी रात्री ट्रँक्टर कारखाण्यावर लावून संतोष हा आपल्या दुचाकीवरुन गावाकडे परत जात असताना पाडळसिंगीजवळ समोर बीडकडे चाललेल्या ट्रकला ओव्हरटेक करताना पाठीमागून दुचाकीची धडक बसली. या अपघातात संतोष हा जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यानंतर मयत संतोष चा मृतदेह गेवराई उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. दरम्यान मयत तरुणाच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार असून संतोष हा होतकरू तरुण होता. या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement