Advertisement

आर्यन खान प्रकरणातून समीर वानखडे यांना हटवले

प्रजापत्र | Friday, 05/11/2021
बातमी शेअर करा

 

मुंबई- क्रुज ड्रग्ज पार्टी प्रकरणी एक मोठा अपडेट समोर आलं आहे. एनसीबीने या प्रकरणाच्या तपासाचे नेतृत्व करणारे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना तपासातून काढून टाकले आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडेवर आठ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. वानखेडे यांना हटवल्यानंतर या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस अधिकारी संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरणाचा तपास काढून घेतला असला, तरीदेखील ते मुंबईचे झोनल डायरेक्टर म्हणून कायम राहणार आहेत. आता एनसीबीचे केंद्रीय पथक आर्यन खान आणि समीर खानच्या प्रकरणांची चौकशी करू शकते, असे बोलले जात आहे.

 

आता हे प्रकरण दुसऱ्या अधिकाऱ्याकडे वर्ग झाल्याने राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी ही फक्त सुरुवात आहे, व्यवस्थेला मुळापासून साफ ​​करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. समीर वानखेडे यांना पाच प्रकरणांमधून काढून टाकण्यात आल्याचे त्यांनी ट्विट करुन लिहिले आहे. आणखी 26 प्रकरणांचा तपास बाकी आहे. ही फक्त सुरुवात आहे, व्यवस्था मुळापासून पुसली जाईल, असे ते आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहेत.

Advertisement

Advertisement