Advertisement

सशस्त्र दरोडा टाकून लाखोंच्या मुद्देमालाची चोरी

प्रजापत्र | Thursday, 04/11/2021
बातमी शेअर करा

येरमाळा प्रतिनिधी - वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे दिवाळीच्या पहिल्या दिवशी सशस्त्र दरोडा टाकून लाखोंचा मुद्देमाल चोरून नेल्याने खळबळ माजली आहे.आहे.त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

गुरुवार (दि.४) रोजी पाहाटे ३ सुमारास तेरखेडा येथे चार ठिकाणी शस्त्रधारी चार चोरट्यानी सुरुवातीला तेरखेडा येथील फटाका व्यावसायिक सद्दाम पठाण ह्यांच्या घरी घरातील पाठीमागच्या बाजूस असलेल्या दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला.प्रवेश केल्यानंतर चोरट्यानी किचन मध्ये डब्ब्यात ठेवलेली रोख सात लाख रुपये रोकड चोरट्यानी चोरून मोर्चा अर्जुन शिंदे ह्यांच्या घराकडे वळवला.मात्र खोलीमध्ये कोणत्याही प्रकारचा ऐवज व खोलीमध्ये कोणीही नसल्याने चोरट्याना रिकाम्या हाताने परतावे लागले. त्यांनंतर चोरटे शिवाजी सावन्त ह्यांच्या घराची मुख्य दरवाजाची कडी तोडून देवघरा मध्ये असलेले दोन हजार रुपये रक्कम चोरले.घरातील मंडळींना घरात कोणीतरी शिरले आहे ह्याची चाहूल लागताच जागे झाल्याने चोरट्यानी त्या ठिकाणाहून धूम ठोकली.चोरट्याचा पाठलाग करत असताना प्रतिकार म्हणून काही चोरट्यांनी सावन्त ह्यांना दगड-गोटे फेकून मारले व शेजारील तारेच्या कंपाऊंड वरून उड्या मारत पलायन केले.त्यानंतर साडे तीन च्या दरम्यान चोरटे जनहित वसाहती मध्ये रमा मिल जवळ राहत असलेल्या सेवानिवृत्त सैनिक बळीराम माने ह्यांच्या घराचे चॅनल गेटचे कुलूप कटर च्या साह्याने तोडून घरात प्रवेश केला.प्रवेश केल्यानंतर घरातील एका खोलीत प्रवेश करून कपाटातील सामान अस्ताव्यस्त करत कपाटातील रोख रक्कम एक लाख रुपयांची रक्कम ठेवलेली बॅग चोरली चोरट्यांचा हा प्रकार सुरू असताना त्याच खोलीमध्ये बळीराम माने ह्यांच्या वृद्ध मातोश्री ह्यांना जाग आली असता त्यांना मारहाण केल्याने त्यांच्या खांद्यावर ईजा झाली.त्यांनंतर चोरट्यांनी दुसऱ्या खोलीला बाहेरून कडी लावत एक खोलीमध्ये झोपलेल्या माने ह्यांच्या मुलाच्या खोलीच्या दारावर चोरट्यांनी थाप मारून त्यांना उठवले व अजय माने ह्यांनी दार उघडताच चोरट्यांनी त्यांना पकडले अजय माने ह्यांनी प्रतिकार करत असताना एक चोरट्याने माने ह्यांच्या उजव्या हातावर चाकूने वार केले.चाकूने वार केल्याने त्यांच्या हाताला गंभीर ईजा झाली आहे.त्या झटापटी मध्ये माने ह्यांच्या पत्नीच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे गंठण हिसकावले.घरातील मंडळींनी आरडाओरडा केला असता चोरटे घरातून पसार झाले.त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

 

        सदरील दरोड्याची गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया दुपार पर्यंत सुरू होती.पुढील अधिक तापासासाठी येरमाळा येथिल स.पो.नि मोदे, पो.नि नाईकवाडी बि. अ.वाघचौरे पो.कॉ. सांडसे, शिंदे, बेले, राठोड, कोळी,पवार तसेच स्थानिक गुन्हे शाखा पथक पो.नि माने व आयकर युनिट चे उस्मानाबाद येथील स.पो.नि थोरात वैज्ञानिक मदतनीस व श्वान पथकातील ढोणे व नेटके आदी.तपास करत आहेत.

गेल्या वर्षी ऐन दिवाळीमध्ये गावातीलच किराणा व्यावसायिक शंकर वराळे ह्यांच्या घरी देखील चोरट्यांनी अशाच प्रकारे सशस्त्र दरोडा घालत रोख रक्कम व सोने लुटत लाखोंचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला होता.ह्या गंभीर घटनेची दखल जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक राज तिलक रोशन ह्यांनी घटना स्थळी धाव घेत सदरील दरोड्याचा तात्काळ छडा लावून दरोडेखोरांना अटक करू असे स्थानिक पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.मात्र त्या घटनेला एक वर्ष पूर्ण होऊन देखील दरोडेखोर मोकाट असल्याने सातत्याने चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांच्या कामगिरीवर सवाल उपस्थित होत आहेत.गावामध्ये सी.सी.टीव्ही असता तर आम्हाला अधिक वेगाने तपास करण्यास मदत झाली असती अशी माहिती येरमाळा पोलीस स्टेशन चे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक मोदे ह्यांनी सांगितले

Advertisement

Advertisement