Advertisement

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

प्रजापत्र | Friday, 10/05/2024
बातमी शेअर करा

 अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणाचा आज १० वर्षांनी निकाल अखेर लागला. २० ऑगस्ट २०१३ मध्ये पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पाच आरोंपींविरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी आज निकाल आला असून सचिन अंदुरे आणि कळसकर या दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

 

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात पाच आरोंपींविरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. या पैकी शरद कळसकर आणि सचिन अंडूरे याच्यावर गुन्हा सिद्ध झाल्याने ५ लाखाचा दंड आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर तीन इतर आरोपीवर संशय होता मात्र सबळ पुराव्या अभावी तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. डॉक्टर वीरेंद्र तावडे,विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement