Advertisement

मराठवाड्यात येलो अलर्ट जारी

प्रजापत्र | Friday, 10/05/2024
बातमी शेअर करा

 मागील दोन आठवड्यापासून मराठवाड्यासह संपूर्ण राज्य उन्हाच्या तडाख्याने हैराण झाले होते. मात्र हवामान विभागाने आता मराठवाड्यात येलो अलर्ट जाहीर केला असून वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

 

 

मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात सूर्य  लागला आहे. यामुळे तापमान ४२ अंशाच्या वर पोहचले असून उन्हाचा प्रचंड कडाका जाणवत आहे. परंतु मागील दोन- तीन दिवसांपासून काही भागात अवकाळी पाऊस झाल्याने तापमानात घट झाली आहे. तर आता मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाच्या उकाड्यापासून दिलासा मिळणार असला तरी देखील फळबागा आणि पिकांचे नुकसान होण्याच्या शक्यतेमुळे सध्या नागरिक चिंतेत आहे. 

 

आगामी दोन दिवस पावसाची शक्यता 

पुढील दोन दिवस मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या भागांना हा इशारा देण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी या काळात आपली काळजी घेण्याची आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement