Advertisement

पाच वर्षे अभिनय क्षेत्रामधून घेणार ब्रेक

प्रजापत्र | Friday, 10/05/2024
बातमी शेअर करा

मराठमोळे अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे सर्वत्र आपल्या अभिनयातून प्रसिद्धीझोतात आले आहे. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकांमुळे प्रसिद्धी मिळाली आहे. अमोल कोल्हे एक प्रसिद्ध अभिनेते असून शिरूर लोकसभा मतदारसंघाचे ते खासदारही आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणूकीमध्ये अमोल कोल्हे पु्न्हा एकदा उभे राहिले आहेत. सध्या निवडणूकीच्या प्रचारात व्यग्र असताना खासदार अमोल कोल्हे यांनी मालिका विश्वातून पुढील पाच वर्षांसाठी ब्रेक घेण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

 

अमोल कोल्हे आता दुसऱ्यांदा शिरूर लोकसभेच्या निवडणूकीसाठी उभे राहिले आहेत. २०१९ मध्ये अमोल कोल्हे पहिल्यांदा शिरूर लोकसभेतून खासदार म्हणून निवडून आले. शिरूर लोकसभा मतदारसंघात त्यांनी अनेक विकास कामे केली आहेत.

 

 

शिरूरच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढची ५ वर्षे अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार असल्याचं कोल्हेंनी सांगितले आहे. कामं प्रत्यक्षात येणं, त्याला वेळ देणे गरजेचे आहे. त्यामुळे मालिका विश्वात काम करताना एवढा वेळ देणं शक्य नाही. मालिका विश्वातून अभिनयाला पाच वर्ष ब्रेक द्यावा लागणार आहे, असं मत स्वतः खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.

Advertisement

Advertisement