बिसीजीची लस उजव्या दंडावर तर पोलिओ न पाजताही पाजल्याचा परिचारीकेचा कांगावा
औसा-कोरोना काळात ज्यांना सर्वांनी देवदूत म्हटले त्या आरोग्य विभागाला आता कांही जण यमदूत बनले की काय असा प्रत्य औसा ग्रामिण रुग्नालायात होताना दिसतोय एका परिचारीकेने सेवा देताना फोनवर बोलत थेट बीसीजीची लस चक्क बाळाच्या उजव्या दंडावर दिल्याने एका तीन महिन्यांच्या बाळाच्या हाताला गंभीर दुखापत झाली असुन त्याच परिचारीकेने याच बाळाला पोलिओचा डोस न पाजताही पाजल्याचा कांगावा केला होता. वरिष्ठांनी व बाळाच्या नातेवाईकांनी जाब विचारल्यावर नंतर तिने तो डोस पाजला. या परिचारीकेच्या या प्रतापाने लहान बाळांना डोस देण्यासाठी पालकांचा जिव टांगणीला लागला असुन उजव्या दंडावर बीसीजीची लस दिल्यामुळे बाळाच्या दंडावर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. संबंधीत परिचारीका यांच्या विरोधात येथील वैद्यकीय अधिक्षक यांनी आपल्या वरिष्ठांकडे तक्रार केल्याचे समजते.एकूणच
सेहरीन दारुवाले (वय साडे तीन ) महीने या बाळाला लसीकरणासाठी व पोलिओ पाजण्यासाठी औशाच्या ग्रामिण रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. तेथे कर्तव्यावर असलेल्या परिचारीका श्रीमती कलशेट्टी यांनी या बाळाला पोलिओचा डोस न पाजता कार्डवर डोस पाजल्याची इंट्री केली. मात्र बाहेर आल्यावर बाळाला पोलिओ पाजला नसल्याचे लक्षात आल्यावर संबंधीतांनी वैद्यकीय अधिक्षक डॉ. अंगद जाधव यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांनी या परिचारीकेला विचारले तेव्हा तिने बाळाला पोलिओ पाजल्याचे खोटे सांगीतले मात्र नातेवाईकांनी कधी पाजले असा दट्टा लावताच बॉक्स मध्ये ठेवलेले पोलिओ पाजण्यात आले. त्यानंतर त्याच बाळाला सारोळा रोडवर असलेल्या कॅम्पमध्ये हेपॅटायटिस बी. आणि बीसीजीची लस देण्यात आली. ही लस देतांना संबंधीत परिचारीका फोनवर कोणाशी तरी बोलत होती. नातेवाईकांनी बीसीजी डाव्या दंडावर देतात असे सांगीतले तरीही तीने उजव्या दंडावर बीसीजीची लस दिली. त्या एक महीन्या नंतरही त्या बाळाच्या दांडावर मोठी गाठ आली असुन बाळ आजारी पडले आहे. तर याच परिचारीकेने अज्जिने कोविड लस घेतली नाही म्हणुन बाळालाही लस दिली नसल्याचे समोर आले आहे. अशा कामात अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या परिचारीकेचा लसिकरणाचा विभाग काढून घ्यावा अशी मागणी होत आहे.
....रुग्णालयात डोस देण्यासाठी आलेल्या नातेवाईंकान हुसकावून लावतात परिचारीका...
वेळ झालेली असल्याने शहरातील आनेक पालक आल्या बालकांना घेऊन डोस देण्यासाठी रुग्णालयात येतात मात्र तेथे उपस्थित असलेल्या परिचारीका त्यांना तुम्ही कुठल्या भागातील असे विचारत पाच दिवसांनी कॅम्प तुमच्या भागात येणार आहे. तुम्ही तेथेच लस घ्या इथे तुम्हाला लस घेता येणार नसल्याच आजब फतवा या काढत आहेत. सेहरीनलाही असेच हुसकावण्यात आले होते म्हणुन तीच्या भागात येणाऱ्या कॅम्पमध्ये लस घेतली. याचा परिणाम संबंधीत परिचारीकेने काळजीपुर्वक लक्ष न दिल्याने उजव्या दंडावर बीसीजी टोचली गेली. जर तिला रुग्णालयातच लस दिली गेली असती तर ही पाळी आली नसती.