Advertisement

पेन्शनर्सना घरबसल्या देता येणार हयातनामा

प्रजापत्र | Wednesday, 03/11/2021
बातमी शेअर करा

मुंबई : निवृत्ती वेतन सुरू राहावे यासाठी निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या हयात प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा देणारी नवी सेवा स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) १ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू केली आहे. याअंतर्गत बँकेचे पेन्शन खातेधारक घरबसल्या व्हिडिओ कॉलद्वारे त्यांचे हयात प्रमाणपत्र सादर करू शकतील. या नवीन सेवेला बँकेने ‘व्हिडिओ लाइफ सर्टिफिकेट सर्व्हिस’ असे नाव दिले आहे.

एसबीआयने जारी केलेल्या निवेदनानुसार, व्हिडिओ लाइफ सर्टिफिकेट सेवा ही एक सोपी, सुरक्षित, कागदविरहित आणि मोफत सुविधा आहे. यामध्ये निवृत्तांना नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि पॅन कार्ड आवश्यक असेल. 

 

एसबीआयने निवृत्तांसाठी खास वेबसाइटही तयार केली आहे. निवृत्तांना या वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल. त्यानंतर ते सहजपणे लॉग इन करू शकतात. या वेबसाइटमुळे निवृत्ती वेतनाशी संबंधित अनेक कामे सुलभ होतील. वेबसाइटवर युजर एरियर कॅलक्युलेशन शीट डाउनलोड करता येईल. पेन्शन स्लिप किंवा फॉर्म-१६ डाउनलोड करता येईल. पेन्शन प्रोफाइल डिटेल्स, गुंतवणूक माहिती आणि हयात प्रमाणपत्राची स्थितीही तपासता येईल. बँकेत केलेल्या व्यवहारांची माहितीही या वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे.

Advertisement

Advertisement