Advertisement

ओबीसींसाठी कोणलाही हात जोडायला तयार :भुजबळ

प्रजापत्र | Saturday, 23/10/2021
बातमी शेअर करा

बीडः आम्ही ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश  काढला, त्यावर अगोदर राज्यपालांनी सही केली नव्हती. त्यासाठी मी फडणविसांकडेही गेलो. नंतर अध्यादेशावर सही झाली.ओबिसींसाठी कोणालाही हात जोडायला मी तयार आहे. आता या अध्यादेशाला भाजपचेच पदाधिकारी आव्हान देत आहेत, फडणविस त्यांना आवरणार आहेत का नाही? तुम्हाला आरक्षण संपवायच आहे का? असा सवाल  महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी केला. . समता परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित  कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह आ. संदीप क्षीरसागर, आ. संजय दौंड, अमरसिंह पंडीत,बापुसाहेब भुजबळ , माजी आमदार साठे, उषा दराडे, इश्वर बाळबुधे, मंजिरी घाडगे,शिवाजी सिरसाट , आयोजक सुभाष राऊत यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, ओबीसी अजुनही जागृत नाही, त्याला स्वतःच्या अधिकाराची जाणिव नाही असे भुजबळ म्हणाले. बाबासाहेबांनी मंत्रीपदाचा राजिनामा देण्यामागे ओबिसी आरक्षण दिले जात नाही हे देखिल एक कारण होते. त्यानंतर अनेक आयोग आले, शेवटी मंडल आयोग आला. व्ही पी सिंगांनी तो स्विकारला. मी महाराष्ट्रात त्यासाठी बोलत होतो, त्यासाठी मी शिवसेना सोडली. शरद पवारांनी मंडल आयोग लागु करण्याचा निर्णय घेतला आणि ओबीसींना आरक्षण मिळाले असे भुजबळ म्हणाले. 
२०१० ला समता परिषद न्यायालयात गेली होती आणि ओबीसी जनगणनेची मागणी केली होती. गोपीनाथ मुंडे, समीर भुजबळ यांच्या पाठपुराव्यातुन १०० खासदारांनी लोकसभेत ओबीसी जनगणनेची मागणी केली होती. त्यानंतर केद्राने सामाजिक आर्थिक जनगणना केली. त्याची माहिती केंद्राकडे आहे. यात चुका आहेत असे केंद्र सरकार म्हणतेय, मग ५ वर्षे या चुका दुरुस्त का केल्या नाहीत? आम्हाला ओबीसीचा इंपेरिकल डाटा का दिला नाही?असा सवालही भुजबळ यांनी केला. आम्ही अध्यादेश काढला, त्यावर अगोदर राज्यपालांनी सही केली नव्हती. त्यासाठी मी फडणविसांकडेही गेलो. नंतर अध्यादेशावर सही झाली.ओबिसींसाठी कोणालाही हात जोडायला मी तयार आहे. आता या अध्यादेशाला भाजपचेच पदाधिकारी आव्हान देत आहेत, फडणविस त्यांना आवरणार आहेत का नाही? तुम्हाला आरक्षण संपवायच आहे का? दिल्लीत जाऊन जागरण करा असा सल्लाही भुजबळ यांनी फडणविसांना दिला.
यावेळी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ओबीसींवर आलेल्या संकटात घेतलेल्या आग्रही भुमिकेबद्दल आणि त्यातून मार्ग काढल्याबद्दल, तसेच आपले सबंध जिवन ओबिसींसाठी वाहून घेतले त्याबद्दल छगन भुजबळ यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आ. संदिप क्षीरसागर यांनी भुजबळांवरच्या अन्यायाचा राग अजुनही समाजात असल्याचे सांगितले. तर  बापुसाहेब भुजबळ यांनी सुभाष राऊत हे छगन भुजबळांचे सुदामा असल्याचे सांगितले. छगन भुजबळांवर चांद्यापासून बांद्यापर्यंत जनता प्रेम करते, ओबिसींचे काम केल्यानेच त्यांना जेलमध्ये जावे लागले असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आयोजक सुभाष राऊत यांनी या कृतज्ञता मेळाव्यामागची भुमिका विषद केली. ओबिसींसाठी छगन भुजबळांनी केलेला संघर्ष महत्वाचा असुन आज त्यांच्यामुळेच ओबिसींचा सन्मान टिकून असल्याचे ते म्हणाले. छगन भुजबळांनी माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना ताकद दिल्याचेही राऊत म्हणाले.या सोहळयाला जिल्हाभरातून हजारो समता सैनिकांनी उपस्थिती लावली होती.

 

Advertisement

Advertisement